शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित संघर्ष! ३ महिलांसह पाच जणांची हत्या; लहान मुलांना ठेवलं ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:17 IST

प्रेमप्रकरणावरून हिंसक हाणामारी झाली, ज्यात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.

ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रेमप्रकरणावरून हिंसक हाणामारी झाली, ज्यात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरगड सदर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमागे प्रेमप्रकरण होतं. अविनाश पवार नावाच्या व्यक्तीचा स्थानिक लोकांशी वाद झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. पवार याने दोन लग्न केली होती आणि त्याला मुलंही आहेत. अविनाशच्या प्रेमप्रकरणामुळे स्थानिक लोकांशी असलेला वाद इतका वाढला की, हाणामारी झाली.

रात्री अकराच्या सुमारास लोक झोपले असताना चाकूधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अविनाश आणि अन्य एक महिला जखमी झाली. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि अविनाशची दुसरी पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवलं. घटनेनंतर घटनास्थळी राडा झाला. या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. 

दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी तीन महिला आणि दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशाPoliceपोलिस