शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘झवेरी’तील सराफाची फसवणूक, १३ लाखांचे दागिने घेऊन व्यापारी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 02:57 IST

तक्रार अर्जावरून चौकशीअंती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबई - झवेरी बाजारातील सराफाच्या दुकानात चांदीची भांडी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी आलेला व्यापारीच ठग निघाल्याने, सराफाला १३ लाख रुपयांचा फटका बसला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरगाव परिसरात राहणारे गौरव सुंदरलाल जैन (२९) यांचे झवेरी बाजारात सोने-चांदीचे दागिने व वस्तू विक्रीचे दुकान आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास एक ग्राहक दुकानात धडकला. त्याने सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करायचे असल्याचे सांगितले. स्वत:चे नाव योगेश सुकेनकर असल्याचे सांगून, कल्याणमध्ये सुकेनकर ज्वेलर्स नावाचे दुकान असल्याचे नमूद केले. झवेरी बाजारातील अनेक व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध असून, त्यांच्याकडून नियमित व्यवहार होत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला.जैन यांनीही विश्वास ठेवून त्याच्या मागणीप्रमाणे चांदीची भांडी आणि ७१ तोळे सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर त्याने त्याच्याकडे सध्या रोख रक्कम नसल्याने धनादेश दिला. सुरुवातीला जैन यांनी नकार दिला; मात्र त्यांना बोलण्यात गुंतवून दागिने आणि भांडी घेऊन तो निघून गेला. जैन यांनी तत्काळ ओळख सांगितलेल्या व्यापाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांनी ते अशा कुठल्याच व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगताच जैन यांना धक्का बसला. त्यांनी धनादेश घेऊन बँकेत धाव घेतली. तेथेही योगेशने ज्या बँक खात्याचा धनादेश दिला होता ते खाते बंद असल्याची माहिती मिळाली. योगेशने दिलेला मोबाइल क्रमांकही बंद आल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यात, १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा दागिन्यांवर ठगाने हात साफ केला आहे. त्यानुसार तक्रार अर्जावरून चौकशीअंती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहेत.योगेशने दिलेला मोबाइल क्रमांकही बंद आल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे कळाले. १२ लाख ८१ हजार रुपये किमतीचा दागिन्यांवर ठगाने हात साफ केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई