शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरण : ईडीने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 22:38 IST

Tops Group scam case : या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. चांदोळे याच्यावर पीएमएलए अंर्तगत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देदोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या. चव्हाण यांनी ईडीच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला. 

मुंबई : टॉप्स ग्रुप घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी आरोपी असलेला व प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे याचा ताबा आणखी काही दिवस वाढवून देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्याने ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. चांदोळे याच्यावर पीएमएलए अंर्तगत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग तर चांदोळे याच्यातर्फे रिझवान मर्चंड यांनी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एक्सदस्यीय खंडपीठापुढे युक्तिवाद केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्या. चव्हाण यांनी ईडीच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला. 

चांदोळे याचा ताबा वाढवून न देणे, हे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. ईडीकडे बँकेची मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. एमएमआरडीएकडून मिळालेली माहिती आणि कागदपत्रेही आहेत. या सर्व बाबींची चांदोळेकडे चौकशी करायची आहे. हे सर्व आवश्यक असल्याने चांदोळेचा ताबा वाढवून देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.

चांदोळे याचा या घोटाळ्यात सहभाग आहे, हे सिद्ध करणारे कागदपत्रे ईडीकडे नाहीत. सरनाईक यांना लक्ष्य करण्यासाठी चांदोळेला अडकविण्यात येत आहे. ईडीला सरनाईक यांच्या १२ कोटी रुपये इतक्या काळ्या पैशांसंबंधी माहिती मिळाली. याची माहिती चांदोळे यांना कशी असणार? तो सरनाईक यांचा सीए नाही. चांदोळे सरनाईक यांचा 'माणूस' आहे, हे ऐकीव आहे, असे मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितली.

चांदोळेच्या ताब्याशिवाय ईडी तपास करू शकत नाही का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. कायदेशीर प्रक्रियेद्वारे एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधन आणू शकत नाही. एखाद्याचा ताबा देणे आवश्यक आहे, याची खात्री पटल्यावरच न्यायालय त्याचा ताबा पोलिसांना मिळू शकतो, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpratap sarnaikप्रताप सरनाईकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयadvocateवकिल