शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी बनले चोर अन् अडकले जाळ्यात; तोतया पोलिसांना केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:54 IST

वांद्रे परिसरात राहणारे २५ वर्षीय स्वप्नील भगवान पोटे हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालकाची पैशाची बॅग घेऊन जात असताना ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करत तरुणाचे अपहरण करत त्याच्याकडील ७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दुकलीला एलटी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज भीमसेन कांबळे (४१), राहुल विलास पेडणेकर (४०) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत. 

वांद्रे परिसरात राहणारे २५ वर्षीय स्वप्नील भगवान पोटे हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालकाची पैशाची बॅग घेऊन जात असताना ही घटना घडली. काळबादेवी रोड येथील कसारा चाळ येथे त्यांच्या मागावर असलेल्या दुकलीने पोलिस असल्याची बतावणी करत चौकशी सुरू केली. तरुणाला जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवून रे रोड येथे घेऊन गेले. तेथे त्याच्याकडील ७ लाख रुपयांची रोकड काढून घेत, ती पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करायचे असल्याचे सांगून निघून गेले. एलटी मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला व एलटी मार्ग पोलिस ठाण्याच्या  वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई, पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या भायखळा, दादर, सायन, माटुंगा, आझाद मैदान, एमआरए पोलिस ठाणे हद्दीतील सरकारी व खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवून गुप्त बातमीदारांकडून कमीत कमी वेळात माहिती घेऊन आरोपी राज कांबळे याला माटुंगा येथून व राहुल पेडणेकर यास ललू भाई कंपाऊंड येथून ताब्यात घेतले. दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.

तीन लाखांचे कर्ज आणि रचला कट एक आरोपी एका स्टुडिओमध्ये काम करतो, तर दुसरा सेल्स कंपनीत नोकरीला होता. एकाची नोकरी सुटली होती. त्यात एकावर दोन, तर दुसऱ्यावर एक लाखाचे कर्ज होते.  दुसरीकडे, काळबा देवीतील व्यापाऱ्यांकडे काळा पैसा असतो, त्यामुळे पैसे चोरीला गेले तर त्यांच्यापैकी कुणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचा दोघांचा समज होता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच लुटीचा डाव आखला. ठरल्याप्रमाणे पैसेही चोरी करून पसार झाले.

टॅग्स :theftचोरी