शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

वारंवार होणाऱ्या बलात्काराला कंटाळून 'तिने' घेतला बदला; रेपिस्टला जागीच संपवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 23:46 IST

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही.

अलवर - राजस्थानच्या अलवरमध्ये माजी सरपंचाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा २० दिवसांनी पोलिसांनी समोर आणला आहे. या प्रकरणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. वारंवार होणारं शारीरिक शोषण आणि लैंगिक शोषण यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने दुपट्ट्याने आणि तारेने गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येवेळी मृत युवक नशेत असल्याचंही तपासात उघड झाले आहे. 

अतिरिक्त एसपी अतुल साहू यांनी सांगितले की, १७ मे रोजी कोटकसिम भागातील खानपूर गावात माजी सरपंच धनीराम यादव यांचा मुलगा विक्रम उर्फ ​​लाला याची हत्या करण्यात आली होती. खून केल्यानंतर मृतदेह गावाजवळील शेतात रस्त्याच्या कडेला फेकून दिला. सुरुवातीला हत्येचा उलगडा लवकरच होईल, असे वाटत होते, मात्र घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले. पोलिसांनी कसून तपास केला असता खुनाचे रहस्य उलगडले. विक्रमच्या हत्येच्या आरोपावरून गावातील अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. तिचे एका मुलासोबत संबंध असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. एके दिवशी दोन मुलांनी तिला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी विक्रमलाही कळले आणि याच गोष्टीचा फायदा घेत त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही. दरम्यान, विक्रम तिला सतत त्रास देत होता. अशा स्थितीत अल्पवयीन मुलीने विक्रमला मारण्याचा कट रचला. १७ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलाने विक्रमला आपल्या घरी बोलावले. त्याने दारूच्या नशेत घर गाठले. घरातून अल्पवयीन मुलीने त्याला जवळच्या शेतात नेले आणि दुपट्ट्याने त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घरी आल्यानंतर ती झोपी गेली. सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोलिस अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी सांगितले की, वारंवार शारीरिक अत्याचारामुळे त्रासून अल्पवयीन मुलीने विक्रमचा गळा दाबून खून केला. विक्रम मुलीवर शारीरिक अत्याचार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. १७ मेच्या रात्रीही तो दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या वाईट हेतूने गेला. अखेर नाराज होऊन अल्पवयीन मुलीने त्याचा जीव घेतला. यासोबतच घटनास्थळावरून पुरावेही मिटवण्यात आले. मात्र, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीची नारी निकेतन येथे रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डझनभर लोकांची चौकशी केली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थान