रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; प्रगतीनगरमधील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 19:15 IST2023-03-08T19:15:16+5:302023-03-08T19:15:32+5:30
तुळींज पोलिसांनी आरोपी पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; प्रगतीनगरमधील धक्कादायक घटना
- मंगेश कराळे
नालासोपारा: रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीला घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी आरोपी पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.
प्रगती नगरच्या शुभम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अनिशा पांचाळ (३७) यांना आरोपी पती संतोष पांचाळ याने घरातुन बाहेर काढायचे होते. तसेच दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून तीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपीने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिषा पांचाळ हिचे अंगावर घासलेट टाकुन पेटवुन देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
१) आरोपी पतीने पत्नीला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. पतीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. वसई न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - शैलेंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)