शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 18:52 IST

नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. 

ठळक मुद्दे मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई - काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. 

अत्यंत कडक शिस्तीचे, मृदू स्वभावाचे आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांची ओळख आहे. माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची निवड करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनी बर्वे हे सेवा निवृत्त होणार होते. अत्यंत कमी काळात बर्वे यांनी आयुक्त पदाची धूरा अत्यंत चांगल्यारित्या संभाळली. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे हे निवृत्त होणार असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्यासाठी अनेक दिग्गज आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र, भारताने काश्मिरमधील कलम ३७० हटवल्यामुळे आधिच तणावाचे वातावरण असताना. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित आणि समाजविघातक घटना महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घडू नये. या अनुशंगाने  संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिन्याभरापासून बर्वे यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत चर्चा रंगत आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ बर्वे यांच्या गळ्यात पडल्यानंतर अनेक अमराठी अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती. अमराठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग देखील केली होती. लवकरच गृहखात्याकडून बर्वे यांच्या मुदतवाढीचे आदेश जारी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई पोलिस आयुक्तपदी १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे आहेत. संजय बर्वे हे याआधी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्त