शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कपाळावर गंध; कीर्तनात सहभाग अन् दानपेटीवर डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:46 IST

दागिने, पितळी घंटा जप्त

ठळक मुद्दे मंदिरात चोरी करणारा आरोपी जेरबंद१७ हजाराचा मुद्देमाल जप्त

जालना : कपाळावर गंध, कीर्तनात सहभाग, देवासमोर आगरबत्ती लावणे आदी धार्मिक विधीचे सोंग करीत सहा मंदिरातील दानपेट्या, पितळी घंटा, समई चोरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली असून, त्याच्याकडून १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकारी २७ सप्टेंबर रोजी रात्री गस्तीवर होते. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रेकॉर्डवरील आरोपी बाबासाहेब नारायण वांगे (रा. संजयनगर जुना जालना) हा दिसून आला. पोलिसांना पाहताच पळून जाणाऱ्या वांगे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याच्याकडे लॉक तोडण्यासाठीचे लोखंडी रॉड, पक्कड, स्क्रूड्रायव्हर असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तसेच नारळ, आगरबत्ती, माचिस, हळद-कुंकू आदी पुजेचे साहित्यही मिळाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वांगे याने आपण मंदिरात चोरी करण्यास जात असल्याची कबुली दिली.

वांगे याने जालना येथील अंबड रोडवरील जोगेश्वरी नगर भागातील साई मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले होते. तसेच एकूण सहा मंदिरात त्याने हात साफ केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वांगे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पोना गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रंजित वैराळे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके, किशोर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोहेकॉ सॅम्युअल कांबळे हे करीत आहेत.

दागिने, पितळी घंटा जप्तस्थानिक गुन्हे शाखेने तपासात मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या घरी कारवाई करून १० हजार ५०० रूपये, चार हजार रूपये किंमतीचे दागिने, तीन पितळी घंटा, दोन समई असा एकूण १७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या मंदिरात केली चोरीजालना शहरातील अंबड रोडवरील साई मंदिरातील दानपेटीतील रक्कम, नाव्हारोडवरील मंदिरातील पितळी घंटा व समई, बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील हनुमान मंदिरातील पितळी घंटा व समई, गोंदी येथील अडभंगनाथ महाराज मंदिरातील दानपेटीतील पैसे, गोलापांगरी येथील तुळजाभवानी माता मंदिरातील सोन्याचे दागिने व पेटी फोडून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाArrestअटकPoliceपोलिसtheftचोरी