शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत संतापजनक घटना: पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:43 IST

तिकीट तपासनिसाच्या त्रासामुळे तरुणी जवळ असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन बसली. भीतीपोटी ती जवळपास १५ ते २० मिनिटे तेथेच बसून होती.

मनमाड : गोरखपूर-बंगळुरू या विशेष गाडीने कानपूर येथून पुणे येथे जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या तरुणीशी तिकीट तपासनिसाने गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रेल्वे तिकीट तपासनीस तिवारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०६५३० गोरखपूर बंगळुरू या ग्रीष्मकालीन विशेष प्रवासी रेल्वे गाडीने कानपूर येथून पुण्याला जाण्यासाठी फिर्यादी तरुणी प्रवास करत होती. तिने केलेले आरक्षण कन्फर्म झाले नव्हते. ते आरएसी होते. त्यामुळे तिने संबंधित तिकीट तपासनिसाकडे जागेच्या उपलब्धतेसाठी विचारणा केली. त्यावर तिला बी/४ या कोचमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर मात्र तिला ए/१ कोचमधील पाच क्रमांकाची सीट देण्यात आली. फिर्यादी त्या सीटवर गेली असता तिवारी देखील तेथे येऊन बसले. त्यांनी तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. सुरुवातीला चुकून हा स्पर्श झाला असल्याचे समजून युवतीने दुर्लक्ष केले. मात्र नंतर संबंधिताने असाच प्रकार पुन्हा केला. एकटीच प्रवास करणारी तरुणी घाबरली व स्वच्छतागृहात जाऊन बसली.

काही काळ थांबावे लागले स्वच्छतागृहाततिकीट तपासनिसाच्या त्रासामुळे तरुणी जवळ असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन बसली. भीतीपोटी ती जवळपास १५ ते २० मिनिटे तेथेच बसून होती. बाहेर आल्यावर तिकीट तपासनीस तेथेच उभा असलेला पाहून तिने वडिलांशी संपर्क साधून सर्व प्रकार कथन केला. भुसावळ स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. मनमाड पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. रेल्वेतील सुरक्षा जवान कुठे ?प्रत्येक रेल्वे डब्यात व त्यातल्या त्यात वातानुकूलित डब्यात प्रवाशांच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना नियुक्त केलेले असते. घटना झाली त्यावेळी संबंधित सुरक्षा जवान कोठे होता, तो आपले कर्तव्य निभवण्यात कमी पडला का, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे