शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

फातोर्डात थरार ! खतरनाक गुंड अन्वरवर दिवसाढवळ्या गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:33 IST

Firing : पूर्व वैम्यनस्यातून हल्ला: एकाला अटक

ठळक मुद्देया हल्ल्याचे व्हिडीओ त्वरित व्हायरल झाल्याने लोकांमध्येही घबराट पसरली आहे.या अटकेत असतानाच दुसऱ्या आटोपीना धमकी देणारा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

मडगाव: कार्निवल मूडमध्ये असलेल्या फातोर्डा आज दुपारी हादरला. भरदुपारी खतरनाक गुंड अन्वर शेख उर्फ टायगर अन्वर याच्यावर गोळीबार करण्याची घटना सर्वांसमोर घडली. या हल्ल्याचे व्हिडीओ त्वरित व्हायरल झाल्याने लोकांमध्येही घबराट पसरली आहे.

या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी कुडचडे येथील रिकी होर्णेकर याला अटक केली असून अजून दोघेजण फरार असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात अन्वरच्या मांडीला गोळी लागली असून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूर्व वैम्यनस्यातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अन्वर आणि रिकी यांच्यात पूर्वीपासून वैम्यनस्य होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता आहे.

रिकी आणि आणखी तिघेजण मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी अन्वरवर दोन गोळ्या झाडल्या असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अन्वर हा खतरनाक गुंड असून खंडणी, अपहरण, खुनी हल्ले असे त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असून एका वर्षांपूर्वी कुडचडे येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली होती. या अटकेत असतानाच दुसऱ्या आटोपीना धमकी देणारा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सध्या तो जामिनावर मुक्त झाला होता.

टॅग्स :FiringगोळीबारgoaगोवाPoliceपोलिस