शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकानातून दागिने लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 00:53 IST

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ३ महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील चेतन ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

लोणी काळभोर -  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ३ महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील चेतन ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.नंदिनी ऊर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८), रिना यशवंत पवार (वय २७, दोघी रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे) व पूनम काळू पडवळ (वय २९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांच्यासमवेत एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मागील वर्षी ११ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १.१० ते १.२० च्या सुमारास येथील गणपती चौकात असलेल्या चेतन ज्वेलर्स या सोन्याचांदीचे दुकानात तीन अनोळखी महिला व एक अल्पवयीन बालक यांनी संगनमताने मिळून दागिने खरेदीचा बहाणा करून दुकानदाराची नजर चुकवून ५० ग्रॅम वजनाचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. मालक गोपाळ शंकर वर्मा यांना सीसी टीव्ही फुटेज पाहिले. नंतर चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने गुन्ह्याची माहिती व सीसीटीव्ही फूटेज घेऊन ते मल्टीमीडिया, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमाद्वारे प्रसारित केले होते. त्यामुळे फुटेजमधील वर्णनाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहिती खब-याकडून मिळाली. माहितीच्या आधारावर कात्रज येथे सापळा रचून तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या टोळीकडून अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व उपनिरीक्षक तलवार हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे