शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 21:20 IST

Dacoity : त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल,  ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.  

ठळक मुद्देशांतीनगर सेक्टर ५ मध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एस. कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ह्या सराफा दुकानात ७ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या ४ दरोडेखोरांनी आतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ५४ लाखांचे दागिने लुटून पसार झा

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर भागातील सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पैकी उत्तर प्रदेशातून ३ दरोडेखोरांच्या मुसक्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने  आवळल्या आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल,  ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.  शांतीनगर सेक्टर ५ मध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एस. कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ह्या सराफा दुकानात ७ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या ४ दरोडेखोरांनी आतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ५४ लाखांचे दागिने लुटून पसार झाले होते. एका दुचाकीवर दोन दरोडेखोर पसार झाले तर दोन दरोडेखोरांना त्यांची दुचाकी सुरु न झाल्याने ती तेथेच टाकून पळावे लागले होते .पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरु केला . सापडलेली दुचाकी हि नालासोपारा येथून चोरीला गेल्याचे उघड झाले होते . पोलीस आयुक्त सदानंद दाते व अतिरिक्त पोलीस आयुक्त एस.जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी व प्रमोद बडाख, सपोनि विलास कुटे सह अर्जुन जाधव  संजय शिंदे ,अशोक पाटील,  राजू तांबे,  जनार्दन मते, पुष्पेन्द्र थापा , सचिन सावंत, मनोज चव्हाण,  मनोज सपकाळ,शिवा पाटील,  राजेश श्रीवास्तव, गोविंद केंद्रे यांचे पथक हे गेल्या अनेक दिवसां पासून उत्तर प्रदेशात दरोडेखोरांच्या शोधात होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सोबत उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स टीम दरोडेखोरांचा  आझमगढ, जौनपूर, गाझीपूर व लखनऊ भागात शोध घेत होते . अखेर बुधवारी पोलिसांना लखनऊ भागातून ३ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले.विनय कुमार सिंह उर्फ सिंतु सिंह (४७) रा.तारीघाट, जिल्हा-गाझिपुर, शैलेंद्र मुरारी मिश्रा (४२) रा. कटारि सिहुलीया,  जिल्हा;वाराणसी व दिनेश कलऊ निषाद (२४) रा.सरोज बडेवार, जिल्हा - जौनपूर अशी अटक केलेल्या तिघाज दरोडेखोरांची नावे आहेत . तिघेही दरोडेखोर उत्तर प्रदेशचे असून त्यांच्यावर हत्या , हत्येचा प्रयत्न , दरोडा, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर दरोड्यातील आणखी २ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशDacoityदरोडाmira roadमीरा रोडPoliceपोलिस