शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गॅसच्या ओट्याखालून तीन पिस्तूल आणि जीवंत काडतुसे जप्त; एकास अटक 

By प्रदीप भाकरे | Updated: December 4, 2022 15:38 IST

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका रहिवाशाकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. ...

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका रहिवाशाकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.  अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरच्या रात्री ही मोठी कारवाई केली. आरोपीने स्वत:च्या घरातील स्वयंपाकगृहात गॅस ओट्याच्या खाली सिमेंटची एक शेगडी तयार केली होती. त्यात ही पिस्तुले आणि काडतुसे दडविण्यात आली होती. 

अंजनगाव सुर्जी येथून जवळच असलेल्या लखाड या गावातील मोहम्मद नवेद ऊर्फ गुड्डू अब्दुल सलीम (३०) ही व्यक्ती मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या मागावर पोलीस बरेच दिवसांपासून होते. अखेर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मोहम्मद नवेदच्या घरावर धाड टाकली. घराची झाडाझडती घेतली असता, किचनमध्ये गॅस ओट्याखाली शेगडीच्या आतमध्ये तीन गावठी पिस्तूल व त्यामध्ये आठ जिवंत नऊ एमएम काडतूस मिळून आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहम्मद नवेद याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांची उठबस -पोलिसांनी ही कारवाई करताना अंत्यत गोपनीयता बाळगली होती. कारण लखाड येथे मोहम्मद नवेदचे चिकनचे दुकान असून तेथे अवैध धंदे करणाऱ्यांची उठबस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे त्याने यापूर्वी पिस्तूल कोणाला विकल्या, हा व्यवसाय केव्हापासून करतो, याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे कुठवर पोहोचतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

यांनी केली कारवाई -ठाणेदार दीपक वानखडे, पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड, जमादार विजय शेवतकर, नाईक जयसिंह चव्हाण, हर्षा यादव, कॉन्स्टेबल विशाल थोरात, शुभम मारकंड, देवानंद पालवे हे कारवाई पथकामध्ये सहभागी होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती