शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खिल्लारेच्या हत्येत आणखी तिघांचा समावेश, तिघेही कऱ्हाड येथील; पोलिसांकडून ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 07:34 IST

खिल्लारे यांच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी तपासाची सुत्रे फिरविण्यास सुरवात केली होती.

सावंतवाडी- आर्थिक देवघेवीतून आंबोली घाटात घडलेल्या सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात कऱ्हाड येथील आणखी तिघांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. यानंतर, तिघांनाही सावंतवाडीपोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. पार्टीच्या वेळी आपल्याकडून झालेल्या मारहाणीत त्याचा खून झाला, अशी कबूली त्यांनी पोलिसांसमोर दिली. मात्र मृतदेह घाटात टाकताना हे तिघे नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अभय पाटील ( 35),प्रविण बळीराम (25) व राहून माने (23) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांना रविवारी अटक करण्यात आली आहे, अशी माहीती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी सोळंके यांनी दिली.  खिल्लारे यांच्या खून प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी तपासाची सुत्रे फिरविण्यास सुरवात केली होती. दरम्यान त्यांनी दोन दिवस केलेल्या तपासात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडून हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्याने दिलेल्या माहीतीनुसार आपण आर्थिक देवघेवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या खिल्लारे याचे अपहरण केले. त्यानंतर कराड येथिल एका निर्जन ठीकाणी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो यावेळी त्याला सर्वानी मारहाण केली आणी त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी आणखी तिघे भाउसो माने यांच्यासह आपण मिळून आणखी चौघे होतो असे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या माहीतीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोळंके यांच्यासह त्याचे सहकारी पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील,काका करंगुटकर,सचिन कोयंडे,अमित राउळ,गजानन देसाई,अभिजीत कांबळे आदीचे पथक काल कराड येथे गेले आणि  तिघांना ताब्यात घेतले.

 याबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके म्हणाल्या या प्रकरणात संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनिय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यानंतर, या प्रकरणात या तिघांचा थेट सहभाग असल्याचे  निष्पन्न होत आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSawantwadiसावंतवाडी