शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

15 लाखांच्या कोकेनसह तीन नायझेरियन अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:13 IST

चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय - २२) हे तिघेजण  त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते.

मुंबई - मालाडच्या मालवणी परिसरात येत असलेल्या नायझेरियन तस्करांची माहिती मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक फटांगरे यांना मिळली होती. त्यानुसार मालवणी येथील राठोडी गावात पोलिस या तस्करांवर साध्या वेशात नजर ठेवून होते. त्यावेळी चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय - २२) हे तिघेजण  त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना तब्बल 152 ग्रॅम कोकेन मिळून आले ज्याची बाजारात किंमत ही 15 लाख २० हजार रुपये इतकी आहे. हे कोकेन शहरातील उच्चभ्रू वस्तीतील तरुणांसाठी त्यांनी आणल्याची कबूली दिली आहे. 

फोनवरून संपर्क करून हे तस्कर त्यांना अमली पदार्थ घेण्यासाठी निर्जनस्थळी बोलवत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. चुकावे मेका डेनियल अजाह हा मालवणीत राहणार असून अन्य दोन आरोपी हे नायजेरियन असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले. नशेचा अमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायझेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडेच तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने आता या नायझेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मालवणी पोलिसांनी तीन नायझेरियन तस्करांना अटक केली असून त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे 15 लाख २० हजार किंमतीचे152 ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांना 11 परदेशी तस्करांना अटक करण्यात यश आलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ