शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 17:39 IST

महानुभव संतसत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आहे...

लोणी काळभोर : टिळेकरवाडी ( ता. हवेली ) येथील महानुभव संतसत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात राजेंद्र दत्तात्रय खेडेकर ( वय ४१, रा. कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र खेडेकर व त्यांचे मित्र हरिभाऊ कांचन, इंद्रभान लोणकर, संजय भोसले व शामराव सावंत यांनी लोणकर वस्ती, टिळेकरवाडी येथे महानुभाव संतसत्संगांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २२ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान होत आहे.  या सत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी जाधववाडी, ( ता. जुन्नर ) येथील श्री देवदत्त आश्रममधील १ हजार ५०० साधु संत व ५१  मुले आली आहेत. संत श्री जयेश मुनी अंकुलनेरकर ( वय.४३ ) हे या ५१ मुलांना अध्यात्मिक शिक्षण देऊन त्यांची देखरेख करतात. या कार्यक्रमासाठी १२ एकर जागेत मंडप टाकण्यात आला आहे.  तेथेच या सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ११ एप्रिल पासून ५१  मुलांपैकी ३ मुले बेपत्ता आहेत.             केशव राजेंद्र पटेल ( वय.१४, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर,  मुळ गाव बामखेडा, ता. शहादा, जि. नंदूरबार ), शुभम बाळासाहेब बोरगे ( वय.१५, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर, मुळ गाव खेपडी, ता. सिन्नर,  जि. नाशिक ) व गोपीचंद नरेंद्रमुनी अंकुलनेरकर ( वय १४, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर,  मुळ गाव तुडका, ता. तुमसर, जि भंडारा ) या तीन अल्पवयीन मुलांना पळवुन नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस