शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलो हेरॉईन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 03:56 IST

heroin seized at international airport : आफ्रिकेतून येत असलेल्या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबईतील पथकाला मिळाली हाेती.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत आलेल्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेकडून तब्बल २.९६० किलो हेराईन जप्त करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. खानसिले प्रॉमिस खलिशवायो असे या तस्कर महिलेचे नाव असून, मुंबईतील उच्चभ्रू वर्तुळात ती हेराॅईन विकण्यासाठी घेऊन आल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.आफ्रिकेतून येत असलेल्या महिला प्रवाशाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती ‘एनसीबी’च्या मुंबईतील पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार गुरुवारी पहाटेपासून अधिकारी विमानतळावर पाळत ठेवून होते. कतार एअरवेजच्या ०५५६ या क्रमांकाच्या जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईत आलेल्या फ्लाईटमधील खानिसिले प्रॉमिस खलिशवायो हिच्याकडील सामानाची विमानतळावरील तपासणी कक्षामध्ये झडती घेतली असता, राखाडी रंगाच्या बॅगेत वरच्या आवरणाच्या पोकळीत हेरॉईनची दोन पाकिटे तर बॅगेत एक पाकीट लपविलेले आढळले. त्याचे एकूण वजन २.९६० किलो आहे.तिच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी) आणि २१ (सी)चे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ती मुंबईत कोणाकडे या पदार्थांची डिलिव्हरी करणार होती, यापूर्वी तिने अशाप्रकारे अमली पदार्थांची तस्करी केली आहे का, तिचे अन्य कोण साथीदार आहेत, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी