शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बुडवून तीन मुली पार्कात गेल्या, मजा केली, व्हिडिओही बनवला; मग विष प्राशन केलं! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 18:24 IST

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दोन मुलींचा विष प्राशन केल्यानं मृत्यू झाला आहे तर तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे.

इंदूर-

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी दोन मुलींचा विष प्राशन केल्यानं मृत्यू झाला आहे तर तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिघंही शाळा बुडवून शहरातील बागेत मजा-मस्ती करण्यासाठी गेल्या होत्या. तिघांनीही बागेत खूप मस्ती केली आणि त्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडीओ पाहून त्यांच्या मनात आत्महत्येसारखा भयावह विचार आला असेल असं अजिबात वाटणार नाही. तिघांनीही सायंकाळी उशिरा विष प्राशन केलं. दोघांचा मृत्यू झाला तर तिसरी विद्यार्थीनी गंभीर अवस्थेत आहे. तिच्यावर एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

इंदूरमधील राजेंद्र नगर परिसरातील प्रादेशिक उद्यानात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. पूजा आणि पलक अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तिसरीचं नाव आरती असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचा रोहित याच्यासोबत भांडण झालं होतं. त्यामुळेच त्यांनी विष प्राशन केलं. 

दोघींनी विष प्राशन केलं, तिसरी घाबरली अन्...पलकने एवढंच सांगितलं की पूजा तिच्या कुटुंबियांवर काही गोष्टींवरून नाराज होती. याच कारणावरून पूजाने विष प्राशन केलं होतं. त्याचवेळी पलक आणि पूजा यांना विष प्राशन करताना पाहून आरती घाबरली. सुमारे अर्ध्या तासानंतर तिघांनाही माय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिघी जिवंत होत्या. उपचारादरम्यान रात्री पलक आणि पूजा यांचा मृत्यू झाला.

शाळा बुडवून पोहोचल्या होत्या पार्काततिन्ही मुली आष्टा येथील मॉडेल स्कूलमध्ये शिकत होत्या. तिघीही अभ्यासात चांगल्या होत्या आणि दहावीत त्यांना ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. शुक्रवारी तिघही गणवेशाविना शाळेत पोहोचल्या होत्या. गार्डने दोन जणांना गेटवर थांबवलं तेव्हा तिसरीही त्यांच्याच सोबत परतली. त्यानंतर या तिघीही इंदूरच्या प्रादेशिक उद्यानात जाऊन हे आत्मघाती पाऊल उचलले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी