शहरं
Join us  
Trending Stories
1
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
2
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
3
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
4
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
5
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
6
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
7
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
9
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
10
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
11
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
12
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
13
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
14
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
15
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
16
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
17
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
18
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
19
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
20
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!

डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:29 IST

Drowning Case : दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) अकोट फैल अकोला अशी मृतांची नावे आहेत.

नरेंद्र जावरे 

चिखलदरा( अमरावती)  - चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटक युवकांचा जत्राडोहच्या डोहात बुडून मृत्यू झाला रविवारी दुपारी ३:३०वाजता सदर घटना घडली. दोघांचे मृतदेह डोहाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी आणले आहे. दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला. शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७) अकोट फैल अकोला अशी मृतांची नावे आहेत.

एम एच ३० ए झेड ४६२६ व एम एच ०४ एफ एफ ४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले होते, चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविधी पॉइन्ट्सच्या भेट दिल्यानंतर, सर्व मित्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत जत्राडोह पॉईंट आहे. येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात करण्यास सक्त मनाई आहे तरीसुद्धा पर्यटक उतरतात. रविवारी सुद्धा मित्र एकमेकांच्या अंगावर पाणी जात असताना काही खोल पाण्यात उतरल्याने दोघे बुडून मृत्यू पावल्याची पोलिसांनी लोकमतशी बोलताना सांगितले पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट,रितेश देशमुख सहकारी करीत आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होतेखटकाली डोहात एकाचा मृत्यूदुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारया पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. हरीश जानराव काळमेघ  ३८रा चौसाळा तालुका अजनगाव असे मृताचे नाव आहे. शनिवारी आंघोळीसाठी डोहात उतरले असता बुडून मृत्यू झाला त्यांचा मृतदेह रविवारी काढण्यात आला पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश देशमुख प्रभाकर चव्हाण रायबा जावरकर करीत आहे.

 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसAmravatiअमरावतीDeathमृत्यूAkolaअकोला