शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

तरुणीचा नग्न VIDEO बनवला, तब्बल दोन महिन्यांनंतर तिघांना अटक; आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 15:39 IST

तीन तरुणांनी विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केला होता. हा प्रकार समोर येताच आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं.

Sexual Harassment Case ( Marathi News ) : वारणसी येथील आयआयटी बीएचयू इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे आहेत. या नराधमांनी तरुणीचा लैंगिक छळ करत नंतर जबरदस्तीने तिचा नग्न व्हिडिओ काढला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेले तीनही आरोपी भाजपच्या बड्या नेत्यांशी संबंधित असून ते भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारीही असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी वाराणसीत तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या प्रकरणातील आरोपी भाजप नेत्यांच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजय राय यांच्याविरोधातच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आता आरोपी हे भाजपशी संबंधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अजय राय यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय घडलं?

बीएचयू आयआयटी परिसरात १ नोव्हेंबर रोजी तीन तरुणांनी विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केला होता. हा प्रकार समोर येताच आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी ३७६ (डी) कलमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र बरेच दिवस उलटल्यानंतरही आरोपींच्या अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. 

दरम्यान, भाजप नेत्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नव्हती. मात्र स्थानिक पोलिसांतील काही अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश