शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मांजराच्या खवल्यांची तस्करी, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:00 IST

दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रम तुकाराम जाधव (४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) याच्यासह तिघा तस्करांना मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

ठाणे : दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रम तुकाराम जाधव (४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) याच्यासह तिघा तस्करांना मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे अडीच किलो वजनाची ८० ते ९० खवलेही हस्तगत करण्यात आली.मुंब्रा रेतीबंदर पारसिक सर्कलजवळ काळ्या जादूसाठी, तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्रीसाठी तिघेजण आणणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे यांना मिळाली होती. याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गळवे यांच्यासह पोलीस हवालदार सुदाम पिसे, पोलीस नाईक अमोल कदम, तुषार पाटील, पोलीस शिपाई उमेश राजपूत, भूषण खैरनार आणि सुनिल वाघमारे आदींच्या पथकाने सापळा लावून मुंब्रा रेती बंदर पारसिक सर्कलजवळ विक्रम जाधव याच्यासह बाळकृष्ण जोगळे (४९, रा. भिवंडी) आणि अनिल घाडगे (४५, रा. सातारा) या तिघा संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एका हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये ही मौल्यवान खवले हस्तगत करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी