शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:28 IST

व्हेल माशाच्या उलटीचा परफ्यूम बनवण्यासह औषधांमध्ये वापर केला जातो.

कोची:एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची दुर्मिळ व्हेल अँबरग्रीस(व्हेल माशाची उलटी) विकल्याप्रकरणी कोचीमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पर्यावरण आणि वन विभागाने सांगितलं की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एका गुप्त माहितीच्या आधारे, लक्षद्वीपच्या वन अधिकाऱ्यांचे एक पथक ऑपरेशनसाठी कोचीला रवाना झाले होते. लक्षद्वीपच्या वन अधिकाऱ्यांनी व्हेल अँबरग्रीस विकल्याबद्दल कोचीच्या बेटांवरून बुधवारी तीन जणांना अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून 1.4 व्हेल अँबरग्रीस(1 किलो ब्लॅक अँबरग्रीस आणि 400 ग्रॅम व्हाईट अँबरग्रीस) जप्त करण्यात आली असून, बाजारात याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत व्हेल माशाची उलटी विकण्यास बंदी आहे.

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक 

काय आहे व्हेल अँबरग्रीस?व्हेल माशाच्या उलटीला अँबरग्रीस म्हटले जाते. हा पदार्थ व्हेल माशाच्या पोटातून निघतो. व्हेल मासा समुद्रात बऱ्याच वस्तु खातो, यातील काही पचतात तर काही पचत नाहीत. ज्या वस्तु पचत नाहीत, त्या उलटीतून बाहेर पडतात. या वस्तुंचा मेणासारखा गोळा तयार होतो उलटीवाटे बाहेर पडतो. 

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं' 

का महाग विकली जाते उलटी ?ही उळटी व्हेल माशांच्या पाचन तंत्राद्वारे तयार केली जाते. या उलटीतून दुर्गंधी येत असली तरी याचा उपयोग परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. यामुळे परफ्यूम शरीरावर जास्त काळ टिकतो. म्हणूनच परफ्यूम कंपन्या ही उलटी महाग किंमतीत विकत घेतात. या व्यतिरिक्त या अँबरग्रीसचा सेक्सशी संबंधित औषधांसाठी वापर केला केला जातो, म्हणूनच याची किंमत खूप जास्त आहे.

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीfishermanमच्छीमार