शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 12:13 IST

खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी खराडी येथे आलेल्या तिघांना चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

पुणे  : खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी खराडी येथे आलेल्या तिघांना चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी जितेंद्र शिवराम मोहिते (वय 32, रा. श्रीवर्धन, रायगड),योगेश यशवंत पाते(30,रा.दिवे आगार,रायगड), कुमार यशवंत सावंत (46 रा.शिरोळ,कोल्हापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 2(16),39(ब),9/44/50 व 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील प्राईड हाॅटेल मागे तिन इसम दुर्मीळ खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती तपास पथकातील पोलिस नाईक तुषार आल्हाट यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी पथकासह सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असणाऱ्या एका मोठ्या बॅगेत एक दुर्मिळ खवल्या मांजर मिळून आले. अधिक तपासात या दुर्मिळ खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी तिघेही पुण्यात आले होते. या तिघांविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार चंदननगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव,पोलिस नाईक तुषार आल्हाट,पोलिस हवालदार अजित धुमाळ,राजेंद्र दिक्षीत,श्रीकांत गांगुर्डे,पोलिस नाईक दत्ता शिंदे,अमित जाधव,शकुर पठाण,पोलिस शिपाई परशुराम शिरसाट,सुभाष आव्हाड यांच्या पथकाने हि कामगिरी केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे