शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 15:21 IST

खंडणी प्रकरणावरुन केला होता गोळीबार; मामा गँगने पश्चिम हवेली परिसरात दहशत माजविण्याचा केला प्रयत्न

ठळक मुद्देतीन गावठी पिस्टल व ९ काडतुसे जप्त

पुणे : खंडणीच्या कारणावरुन खडकवासला येथे गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार 'मामा' गँगचा म्होरक्या चेतन लिमण याच्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्टल व ९ काडतुसे जप्तकरण्यात आली आहेत. टोळीप्रमुख चेतन ऊर्फ मामा गोविंंद लिमण (वय २८, रा. खडकवासला), किरण महेंद्र सोनवणे (वय २३, रा. किरकटवाडी, ता़ हवेली) आणि दिगंबर दीपक चव्हाण (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.राजू सोनवणे हा व्यावसायिक असून त्याच्याकडे चेतन लिमण हा गुन्हेगार ४ महिन्यांपासून जबरदस्तीने खंडणी वसुल करीत होता. लॉकडाऊनमध्ये चेतन याने तिघांना पाठवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पण कामधंदा नसल्याने सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. सोनवणे यांच्याकडे १७ मे रोजी विजय चव्हाण हे आले होते. रात्री ते घराबाहेर बोलत थांबले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या दिशेने १० गोळ्या झाडत अंदाधुंद गोळीबार केला. त्यातील गोळी चव्हाण यांना लागली व ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. तपासादरम्यान हे आरोपी डोणजे भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस नाईक राजू मोमीन, अमोल शेडगे वत्यांच्या सहकाऱ्यांनी डोणजे भागात त्यांचा शोध घेऊन तिघांना जेरबंद केले. त्यांच्या अंगझडतीत तीन गावठी पिस्टल व ९ काडतुसे मिळाली आहेत.चेतन लिमण याच्याविरुद्ध यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत. त्यातील ५ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. किरण सोनवणे याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल असून त्यातील ३ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. दिगंबर चव्हाण याच्याविरुद्ध खंडणीचा यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. चेतन याच्या मामा गँगने पश्चिम हवेली परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. मामा गँगच्या सदस्यांनी स्थानिकांना त्रास दिल्यास न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक