शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: August 28, 2022 21:43 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील एका खासगी क्लासच्या दहावीतील विद्यार्थीनीवर भिवंडीतील काल्हेर भागात सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली. तिला मारहाण करीत, चावा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सचिन कांबळे (३०), आकाश कनोजिया (२२) आणि आशिष उर्फ आशु मिश्रा (२२) या तिघांनाही गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने रविवारी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी छोटे मोठे इव्हेंट करतात. इंन्स्टाग्रामवर त्यांची पिडीत अल्पवयीन मुलीशी एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत कनोजिया तिला २६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तिच्या खासगी क्लासच्या ठिकाणी घेण्यासाठी आला. तिथून तो तिला घेऊन काल्हेर येथील दुर्गेश पार्क सोसायटीतील एका इमारतीमधील रुमवर घेऊन गेला. तिथे दुपारी २ ते सायंकाळी ४ या दोन तासांच्या दरम्यान सचिन, आकाश आणि आशिष उर्फ आशु या तिघांनीही तिच्यावर लैैंगिक अत्याचार केले. तिने विरोध केला असता, सचिन याने तिच्या पायांवर मारहाण केली. आकाशने तिला त्रास दिला. तर आशुनेही मारहाण करीत या प्रकाराची कोणालाही वाच्यता न करण्याची तिला धमकी दिली.

त्यानंतर काल्हेरमधून तिला ठाण्यातील घरी आणून साेडण्यात आले. या प्रकारामुळे तिला त्रास होऊ लागल्यानंतर तिने २७ ऑगस्ट रोजी रात्री याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. हाच गुन्हा नंतर नारपोली पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग केला आहे.

दरम्यान, शनिवारी पिडित मुलगी तक्रार देण्यासाठी चितळसर पोलीस ठाण्यात आली, त्याच वेळी पोलीस उपायुकत डॉ. विनय राठोड तसेच चितळसरच्या पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने रविवारी (२८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हाजूरीतून सचिन आणि आशिषला तर आकाशला काल्हेर भागातून अटक केली. तिघांनाही आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पिडित तरुणीवर एका शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस