शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 12:25 IST

Crime News Aurangabad: पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

कायगाव, औरंगाबाद : १४ महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील २९ वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी रात्री जेसीबीच्या साह्याने उकरून काढला. अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले असून, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंमळनेर येथील तरुण गणेश दामोदर मिसाळ हा ५ ऑक्टोबर २०१९ पासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी ५ दिवस सर्वत्र शोध घेऊनही गणेश सापडला नसल्याने, १० ऑक्टोबर २०१९ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. 

तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान,  पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित, आणि रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर) यांना ताब्यात घेतले. तपासात सचिन ज्ञानेश्वर पंडित याचे गावातील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि  मयत गणेश याला अनैतिक संबंधाची माहिती होती, तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. या कारणावरून आरोपींनी  कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला आणि प्रेत अंमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या  शेतात पुरून टाकले होते, अशी माहिती समोर आली. 

पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर,  विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ आदींचा या संपूर्ण कारवाईत समावेश होता. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी तंत्रशुद्ध व कौशल्यपूर्ण तपास केल्याने आणि प्रकर्मचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.