अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ठार मारण्याची धमकी, सायबर सेलकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:02 AM2020-07-17T03:02:33+5:302020-07-17T06:50:24+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याची प्रेयसी रियाला चाहत्यांनी धारेवर धरून ट्रोल करणे सुरू केले होते.

Threats to kill actress Riya Chakraborty, complaint to cyber cell | अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ठार मारण्याची धमकी, सायबर सेलकडे तक्रार

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ठार मारण्याची धमकी, सायबर सेलकडे तक्रार

Next

मुंबई : ‘आत्महत्या कर, अथवा तुझ्यावर बलात्कार करून तुला ठार मारण्यात येईल’, अशा आशयाची पोस्ट X@mannu_raaut या इन्स्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आल्याची तक्रारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे केली आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारे टिष्ट्वट रियाने गृहमंत्री अमित शहा यांना केले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याची प्रेयसी रियाला चाहत्यांनी धारेवर धरून ट्रोल करणे सुरू केले होते. मुंबई पोलिसांनीही तिची नऊ तास चौकशी केली होती. त्यानंतर तिला पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभरानंतर रिया चक्रवर्तीने त्याच्यासह स्वत:चा एक फोटो अपलोड करत एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता mannu_raaut या महिलेचा डिस्प्ले पिक्चर असलेल्या अकाउंटवरुन बुधवारी रात्री उशीला तिला धमकी देण्यात आली आहे. रियाने याची माहिती सायबर पोलिसांना देत पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला कडक भाषेत समजही दिली.

‘सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा’
सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारे टिष्ट्वट रियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने मध्यस्थांमार्फत गृहमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही कारणास्तव भेट होऊ न शकल्याने तिने टिष्ट्वट करत सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआकडे वर्ग करण्याची मागणी केली.
सुशांत अशा कोणत्या तणावात होता की ज्यामुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलावे लागले, याबाबत मला जाणून घ्यायचे असून मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे तिने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Threats to kill actress Riya Chakraborty, complaint to cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.