शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानला धमकीचा ईमेल, लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 09:32 IST

पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असताना, शनिवारी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात दुपारी पावणेदोनच्या सुमारास धमकीचा ईमेल आला.

मुंबई :  कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या मुलाखतीनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठ शनिवारी सलमानला पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. प्रशांत सलमानचे मित्र असून, त्यांची आर्टिस्ट मॅनेजमेंटची कंपनी आहे.  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका नवीन मुलाखतीत सलमान खानला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. प्रसिद्धीसाठी नव्हे, तर एका हेतूसाठी आम्ही त्याला मारणार आहोत. प्रसिद्धी किंवा पैशासाठी कोणाला मारायचे असते, तर आम्ही शाहरुख किंवा बॉलीवूडच्या कोणत्याही बड्या व्यक्तीला मारले असते, असेही लॉरेन्स म्हणाला आहे. गेल्या वर्षीही सलमानला ठार मारण्याची धमकी आली होती. 

ईमेलमध्ये काय?पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असताना, शनिवारी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील कार्यालयात दुपारी पावणेदोनच्या सुमारास धमकीचा ईमेल आला. त्यात  गोल्डीभाई को  सलमानसे बात करनी है, तसेच लॉरेन्स बिश्नोई याची मुलाखत बघितली असेलच, त्याने बघितली नसेल, तर बघायला सांग. प्रकरण मिटवायचे आहे. समोरासमोर बसून बोलायचे आहे. आता सांगितले आहे, पुढच्या वेळी झटका देऊ, अशा हिंदी आशयातील मजकुराचा त्यामध्ये समावेश आहे.  त्यानुसार, त्यांनी रोहित गर्ग, गोल्डी भाई आणि लॉरेन्स बिष्णोई विरोधात तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानCrime Newsगुन्हेगारी