शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला धमकावून बलात्कार; सोशल मीडियावर फोटो केले व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 15:25 IST

फिर्यादी महिला व या तरुणाची व्हॉटसअ‍ॅपवरुन ओळख झाली होती.

ठळक मुद्देसांगलीतील आटपाडी पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे केला वर्ग

पुणे : व्हॉटसअ‍ॅपवरुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन धमकावून महिलेवर बलात्कार करुन तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

सुरज चंद्रकांत माने (वय २०, रा. मोहननगर, धनकवडी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे़ 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व या तरुणाची व्हॉटसअ‍ॅपवरुन ओळख झाली होती.त्याने या महिलेला २७ सप्टेंबर रोजी भारती हॉस्पिटलजवळ भेटायला बोलावले.  तेथे तिच्या गळ्याला चाकू लावून एका लॉजवर जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीचे फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिला लग्नाची मागणी घातली. त्याला फिर्यादीने नकार दिल्यावर तिचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर अपलोड केले. तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे फिर्यादी घाबरुन गावी गेल्या. त्यांनी सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आटपाडी पोलिसांनी हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे.पोलीस निरीक्षक ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक