शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या नावाने ठाण्याच्या महापौरांना धमकी; हिशोबात रहायचं अन्यथा उचलून नेऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 21:19 IST

ठाणे महापालिकेत खळबळ

ठळक मुद्देयाप्रकरणाने संपूर्ण ठाणे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडालीमहापौर शिंदे यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठाणे -  ‘तुम्ही नीट राहिले नाही तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटूंबियांना त्रास देऊ, तुम्ही हिशोबात रहायचे’ असे आव्हान देत थेट ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकरच्या नावाने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. याप्रकरणाने संपूर्ण ठाणे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून महापौर शिंदे यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठाण्याच्या महापौर शिंदे यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या मोबाइलवर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.16 ते 11.50 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलत असल्याचा दावा केला. सुरुवातीला धमकी देणाऱ्याने ‘तुम्ही मीनाक्षी शिंदे बोलता का? अशी विचारणा केली. त्यावर महापौरांनी होकारार्थी उत्तर देत काय काम आहे? असेही विचारले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने दाऊदच्या नावाने त्यांना धमकावले. तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता, व्यवस्थित रहात नाही. नीट राहिले नाहीतर तुम्हाला उचलून नेऊ, अशी धमकी दिली असं नमूद केलं आहे. तसेच या धमकीमुळे प्रचंड धास्तावलेल्या महापौरांनी तातडीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलिकडेच महापौर विरुद्ध प्रशासन असाही वाद चांगलाच पेटला होता. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महापौरांचेही नाव चर्चेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील यांच्या नावाने महापौरांना कोण धमकी देऊ शकते? असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमMayorमहापौरPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाthaneठाणे