शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वरळी आग दुर्घटनेत तिसरा मृत्यू; चार महिन्यांचे बाळ व वडिलांनंतर आईनेही प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:27 IST

वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - वरळी गॅस सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या चौघांवर नायर रुग्णालयात उपचार करण्यास दिरंगाई झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र चौकशीचा अहवाल येण्याआधीच डॉक्टरांचा कथित हलगर्जीपणा तिघांच्या जीवावर बेतला आहे. या दुर्घटनेत जखमी चार महिन्यांच्या बाळाचा व त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सोमवारी त्या बाळाच्या आईने देखील अखेरचा श्वास घेतला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व संताप व्यक्त होत आहे. 

वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, नायर रुग्णालयात तब्बल पाऊणतास या जखमींवर उपचार करण्यात आले नाहीत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. उपचार मिळण्यास विलंब झाल्याने या दुर्घटनेत जखमी चार महिन्यांच्या बाळाचा १ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. तर त्याचे वडील, आई आणि पाच वर्षांच्या भावावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, शनिवारी आनंद पुरी (वय २७) यांचा देखील मृत्यू झाला. 

या दुर्घटनेत ५० टक्के जखमी झालेल्या विद्या पुरी (वय २५) यांचे सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. तर १५ ते २० टक्के जखमी झालेला त्यांचा थोरला मुलगा विष्णू पुरी (वय ५) याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी हलगर्जीचा ठपका असलेल्या दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ सदस्यांच्या समितीमार्फत सुरु आहे. 

टॅग्स :fireआग