शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डिमार्टच्या मालाचा ट्रक चोरणारे चोरटे पोलिसांनी केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 16:16 IST

सराईत गुन्हेगार : रबाळे एमआयडीसीत घडलेली घटना

ठळक मुद्दे रबाळे एमआयडीसी मधून ट्रक चोरीला गेल्याची तक्रार 12 ऑगस्टला प्राप्त झाली होती.या पथकाने घटनास्थळ व ट्रकच्या प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासून संशयीत तिघांना अटक केली असता चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

नवी मुंबई : पुणे येथील डिमार्टमध्ये पाठवलेल्या मालाचा ट्रक चोरणाऱ्या तिघांना व चोरीचा माल घेणाऱ्या एकाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रबाळे एमआयडीसी मधून ट्रक चोरीला गेल्याची तक्रार 12 ऑगस्टला प्राप्त झाली होती. ट्रकमध्ये पुणेतील डिमार्ट साठी भिवंडी गोडाऊन मधून पाठवण्यात आलेला माल होता. तर भिवंडी ते पुणे दरम्यान चालकाने विश्रांतीसाठी ट्रक रबाळे एमआयडीसी येथे उभा करून तो घरी गेला होता. यादरम्यान अज्ञात व्यक्तींनी बनावट चावीद्वारे ट्रक चालू करून चोरला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गिते यांनी निरीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक नितीन खाडे, सागर गवराने, उपनिरीक्षक शरद आव्हाड, हवालदार मेघराज देवरे, रघुनाथ मागी, अजित यादव, हेमंत पाटील, वैभव पोळ, तुषार जाधव, नितीन सोनवणे आदींचे पथक तयार केले होते.

या पथकाने घटनास्थळ व ट्रकच्या प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही तपासून संशयीत तिघांना अटक केली असता चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चंपालाल चौधरी (30), प्रकाश चौधरी (20) व मोहम्मद पठाण (20) अशी त्यांची नावे आहेत. भिवंडी येथून ट्रक निघाला असता खासगी कारमधून ते ट्रकचा पाठलाग करत होते. अखेर तो रबाळे एमआयडीसी मध्ये उभा केला असता बनावट चवीने तो चालू करून चोरला होता. यानंतर त्यांनी सदर ट्रक त्यामधील मालासह नरेश भानुशाली (37) याला विकला होता. यानुसार भानुशाली याला देखील 28 ऑगस्ट रोजी अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. या टोळीकडून चोरीचा ट्रक, गुन्ह्यात वापरलेली कार तसेच ट्रकमधील माल असा 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक  चोरणारे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस