शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चोर समजून तिघांना बांधून मारहाण;  नगरसेविकेच्या पतीसह तिघांना अटक,पोलिसांनाही धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 13:50 IST

पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने, साेमवारी रात्री संतप्त ग्रामस्थांनी पातान बंदर येथे तीन तरुणांना चोर समजून बांधून मारहाण केली. गणेश भोईर (१९), हरचंद भोईर (२०) व अंकुश भासर (२१, सर्व रा.उत्तन) अशी तरुणांची नावे आहेत. 

पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १८ ते २३ जणांवर गुन्हा दाखल करून शिवसेना नगरसेविकेचा पती अजित गंडाेली, सायमन बगाजी व सचिन नून या तिघांना अटक केली आहे.  पोलीस नाईक चेतन पाटील यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यानुसार, सोमवारी रात्री १०.४५ वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या फाेनवरून भुतोडी-पातान बंदरदरम्यान चोर समजून मंडपाचे काम करणाऱ्या तिघांना जमावाकडून मारहाण सुरू असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर, उपनिरीक्षक किरण धनवडे आपल्या दाेन सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. दाेरीने बांधून ठेवलेल्या तिघांना मारहाण करत होते. जमावाला आवाहन करून जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे धनवडे यांनी अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर धनवडे यांनी शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांचे पती अजित यांच्यासह सायमन बगाजी व सचिन नून यांना कायदा हातात न घेता तरुणांना ताब्यात द्या, अशी विनंती केली. त्यांनी ते ऐकले नाही. 

पाेलिसांना गराडा

जमावाने विराेध करून पोलीस व वाहनाभोवती गराडा घातला. त्यांना गाडीत बसविल्यानंतर पोलिसांनी जमावावर बळाचा वापर करताच, लोकांनी पाेलिसांना पुन्हा धक्काबुक्की केली आणि तिघांना बाहेर काढून पुन्हा मारहाण केली. पोलिसांच्या गाडीवर लाथा मारल्या. जादा कुमक येताच पाेलिसांनी तिघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणेPoliceपोलिस