यवतमाळ : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाचक फाैजदाराच्या मुलीच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गोदणी रोडवरील अवधुतवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली.सदर तरुणी दुचाकीने जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिला थांबविले. यावेळी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून त्यांनी पोबारा केला. चापमनवाडीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील शोध पथक दाखल झाले. त्यांनी या चोरट्यांची शोधमोहीम चालविली आहे. फाैजदाराची मुलगी आणि त्यातही पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहर व जिल्ह्यात मालमत्तेसंबंधीचे गुन्हे वाढले आहेत. मंगळसूत्र-चेन हिसकावणे, दुचाकी वाहनांची चोरी, घरफोडी हे प्रकार सर्रास घडत आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे व घडण्यापूर्वी गुन्हा रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाच्या मुलीची चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 14:38 IST
Chain Snachting Case : ही घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गोदणी रोडवरील अवधुतवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाच्या मुलीची चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहर व जिल्ह्यात मालमत्तेसंबंधीचे गुन्हे वाढले आहेत.