शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इतवारीत चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकाने फोडली , व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:40 IST

मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी रात्री चोरट्यांनी इतवारीच्या तीन नळ चौकात दोन दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.इतवारीच्या तीन नळ चौकात कसार ओळीत जरीपटका येथील रहिवासी राजकुमार मुलचंदानी यांची भागचंद तोलाराम फर्म आहे. मुलचंदानी जोडे-चपलांचे होलसेल व्यापारी आहेत. चोरट्यांनी आधी मुलचंदानी यांचे दुकान फोडले. सब्बलच्या साह्याने शटर तोडले. दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले लाखो रुपये पळविले. मुलचंदानी यांच्या दुकानापासून थोड्याच अंतरावर शेखर जैन यांचे लक्ष्मी मेगा मार्ट दुकान आहे. या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटे दुकानात घुसले. दुकानाच्या काऊंटरमध्ये २५० रुपये ठेवले होते. आरोपींनी हे पैसे घेऊन पळ काढला. रात्री २.३० वाजता मुलचंदानी यांना चौकीदाराने सूचना दिली. ते त्वरित दुकानात पोहोचले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी परिसरातील इतर दुकानातही चोरी केल्याचा संशय आल्यामुळे मुलचंदानी यांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना लक्ष्मी मेगा मार्टचे कुलूपही तुटलेले दिसले. त्यानंतर शेखर जैन आणि मुलचंदानी यांनी तहसील पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश आहे. ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांनी आरामात चोरी केली. घटनेच्या वेळी या परिसरात कुणाचेही येणे-जाणे नसते, हे चोरट्यांना माहीत होते. परिसरात यापुर्वीही व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी झाली आहे. हवालाची रक्कम असल्याचा संशय आल्यामुळे एका दुकानात चोरी झाली होती. इतवारी हा व्यापारी आणि रहिवासी परिसर आहे. येथे चोरी करणे सोपे नाही. तहसील पोलिसांची परिसरात गस्त असते. व्यापाऱ्यांनी आपले सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत. तरीसुद्धा चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सोमवारी दुपारी गांधीबागमध्ये रिक्षासह ८६ हजाराच्या गारमेंटचे पार्सल चोरी केले होते. या घटनेचा खुलासा होण्यापूर्वीच दोन दुकानात चोरी झाली. तहसिल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. शेखर जैन यांनी केवळ २५० रुपये गेल्यामुळे तक्रार दाखल केली नाही तर मूलचंदानी यांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.

टॅग्स :theftचोरीMarketबाजारnagpurनागपूर