शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दांडेकर नगरमध्ये चोरट्यांनी दोन घर फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास 

By सागर दुबे | Updated: April 22, 2023 13:52 IST

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : शहरातील दांडेकर नगर येथे एकाच इमारतीमध्ये राहणारे सुमेधपंडीत माधव नेतकर या शिक्षकासह भुषण सुधाकर उंबरकर यांचे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख २३ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दांडेकर नगरामधील कार्तिक पार्क येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षक सुमेधपंडित नेतकर हे पत्नी ज्योती व मुलासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी नेतकर कुटूंब घराला कुलूप लावून खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी १.५० वाजेच्या सुमारास ज्योती नेतकर या घरी आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त फेकलेला पहायला मिळाला. ज्योती यांनी लागलीच पती सुमेधपंडित यांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यानंतर घरात पाहणी केल्यावर ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ५०० रूपये किंमतीची चांदीची चेन असा एकूण १ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले.

तिसऱ्या मजल्यावरील घरातही चोरी...नेतकर कुटूंब राहत असलेल्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भुषण सुधाकर उंबरकर हे वास्तव्यास असून त्यांचे सुध्दा बंद घर चोरट्यांनी फोडून १ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पदक, २ हजार रूपये किंमतीची चांदीची गोप व मोठी वाटी असा एकूण ३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही समोर आले. त्यानंतर नेतकर यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी