शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

By विलास जळकोटकर | Updated: December 15, 2023 19:34 IST

तिघांकडून गुन्ह्याची कबुली : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

विलास जळकोटकर,सोलापूर : दोन ठिकाणी घरफोडी करुन दागिने चोरुन नेणाऱ्या मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाकडून विडी घरकूल परिसरातून तर सिगारेटची पाकिटे चोरणाऱ्या दोघांना कल्याणनगर परिसरातून ताब्यात घेतले. गुरुवारी ही कारवाई करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख १८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, सिगारेटची पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ७ डिसेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि श्रीनाथ महाडिक, विजय पाटील गुन्हेगारांच्या मागावर होते. बातमीदारामार्फत घरफोडीच्या गुन्ह्यातील मुलगा (विधीसंघर्ष बालक) हा चोरीचे दागिने विक्रीसाठी विडी घरकूल येथील सोना चांदी अपार्टमेंट ते गोंधळे वस्ती रोडवर सानियानगर येथे येणार असल्याची खबर मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने विडी घरकूल परिसरात सापळा लावला. खबऱ्याच्या माहितीनुसार एक मुलगा संशयास्पद स्थितीत वावरताना त्याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने दोन ठिकाण घरफोडी केल्याचे कबूल केले. त्याच्या आईच्या उपस्थितीत त्याने चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून पोलिसांना दिली.याचबरोबर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कन्टीनचा पत्रा उचकटून ९ हजार ३१० रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरणाऱ्या प्रशांत दत्तात्रय गरडे (वय- २०, रा. कल्याणनगर भाग २, सोलापूर) आणि सोमलिंग सिद्धाराम फुलारी (वय- १९, रा. कल्याण नगर भाग १, सोलापूर) या दोघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला.तीन गुन्हे उघडकीससंबंधीत मुलानं केलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेल्या चोरीतील २१ ग्रॅम सोन्याचे दागिने व १४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २१ ग्रॅम सोने आणि १४० ग्रॅम चांदीचे दागिने, २२ हजार ५०० रुपये रोकड असा १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या स्वाधीन केला. तर कॅन्टीनमधून ९ हजार ३१० रुपयांची सिगारेटची पाकिटे अन्य दोघांनी काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीSolapurसोलापूरjewelleryदागिने