शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

गणपतीच्या दर्शन गर्दीत चोरांनी हातसफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 22:06 IST

...आणि ६७ वर्षीय आजींना भेटला देवदूत 

ठळक मुद्दे३० ते ४० आयएएस अधिकाऱ्यांनीही पत्नीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्यापैकी दोन ते तीन अधिकाऱ्यांच्या पत्नीची पर्स गहाळ झाल्याचे समोर आले.

मुंबई - बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची ठिकठिकाणी रीघ लागलेली आहे. याच गर्दीचा फायदा घेत गुजरात, राजस्थानमधून आलेली टोळी भाविकांच्या पाकिटांसह मोबाइलवर डल्ला मारत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या दोन ते तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या पत्नीची पर्स चोरीस गेली.लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशीच मोबाइल गहाळ होण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. सध्या तक्रारींचे प्रमाण कमी असले तरी नागरिकांनी सामानाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी सिद्धिविनायक आणि सायंकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यासोबतच ३० ते ४० आयएएस अधिकाऱ्यांनीही पत्नीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्यापैकी दोन ते तीन अधिकाऱ्यांच्या पत्नीची पर्स गहाळ झाल्याचे समोर आले. मात्र, पर्समध्ये जास्तीचा ऐवज नसल्याने याबाबत तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यासह भाविकांनाही सावध राहण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.

पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या येथे कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली येथे १० साहाय्यक पोलीस आयुक्त, ४ पोलीस निरीक्षक, २० साहाय्यक पोलीस निरीक्षक, ५९ पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल आणि दंगल नियंत्रण पथकाची प्रत्येकी एक तुकडी, डीएमएफडी आणि एचएचएमडी प्रत्येकी २४, सीसीटीव्ही व्हॅन २ आणि २ कॉम्बॅक्ट व्हॅन तैनात ठेवल्या आहेत.

...आणि ६७ वर्षीय आजींना भेटला देवदूत 

शीतल मांजरेकर (६७) या सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान, त्यांना भोवळ आल्याने त्या कोसळल्या. त्या वेळी तेथे तैनात असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी त्यांना गर्दीतून वेळीच बाहेर काढले आणि त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचविले. त्यामुळे या गर्दीत देवदूतच भेटल्याचे आजींनी सांगितले.  

टॅग्स :Lalbaugcha Rajaलालबागचा राजाGanpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिसRobberyचोरी