शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंडईतील शारदा गणपतीचे दागिने चोरणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 12:15 IST

अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्‍या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता.

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील शारदा गणपतीचे दागिने चोरुन नेणार्‍या चोरट्याला मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजा रुपयांचे दागिने व रोख दीड लाख रुपये असा ऐवज जप्त केला आहे. अजय महावीर भुक्तर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

मंडईमधील अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्‍या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्यांनी श्री शारदा गजाननाच्या मुर्तीवरील सुवर्णहार, कंठी, मंगळसुत्र अशी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. मंदिराचे पुजारी शुक्रवारी सकाळी नित्यपुजेसाठी मंदिरात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक लहामगे, अंमलदार चव्हाण, वाडेकर, जाधव, चव्हाण, महाजन, गुजर, खांडेकर हे हद्दीत गस्त घालत असताना धनजी स्ट्रीट नाका येथे शनिवारी सायंकाळी एक जण संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड आढळून आली. अधिक चौकशी केल्यावर त्याने आपण पुण्यातील गणेश मंदिरात चोरी केल्याची कबुल दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन आरोपीला त्याच्या ताब्यात दिले.

याबाबत पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा माग काढण्यात आला. तेव्हा तो रेल्वेने मुंबईला गेल्याचे दिसून आले. तो कुर्ला येथील ज्या हॉटेलमध्ये थांबला होता. तेथे पुणे पोलीस पोहचले. त्याने या हॉटेलमध्ये सोने कोठे विकता येईल, याची चौकशी केली होती.

तेव्हा हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी त्याला दागिना बाजार हे ठिकाण सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी या बाजारपेठेतील सर्व सराफ व्यवसायिकांना नोटीस बजावून त्यांना असा कोणी दागिने विकण्यास आल्यास कळविण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. दरम्यान, दागिने विकण्यासाठी आलेला आरोपी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या निदर्शनास आला व त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरीMumbai policeमुंबई पोलीसPuneपुणे