शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने चाकू पोटात खुपसला अन् केली हत्या; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:25 IST

The thief stabbed in the stomach : मुंबईतील तरुणाची विरारमध्ये निर्घृण हत्या

ठळक मुद्देउपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी जबरी चोरी, हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडल्यावर तरुणात व चोरट्यात झटापट झाली.

नालासोपारा - मुंबईत राहणारा ३० वर्षीय तरुण, त्याची पत्नी व सासू विरारमध्ये नातेवाइकांकडे आले असता बुधवारी रात्री घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात ट्रेनचे तिकीट काढताना चोरट्याने त्याचे पाकीट चोरले. तरुणाने चोरट्याचा पाठलाग करून स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडल्यावर तरुणात व चोरट्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने धारदार चाकू तरुणाच्या पोटात खुपसला. जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी जबरी चोरी, हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.

मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा हर्षल वैद्य (३०), त्याची पत्नी प्रियंका आणि सासू प्रभावती मानकामे (६०) हे तिघे बुधवारी विरार येथे राहणाऱ्या नातेवाइकांकडे नवरात्रीनिमित्ताने आले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई येथील घरी जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकाजवळील पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी आले. त्याचवेळी एका चोरट्याने हर्षलचे पाकीट चोरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर पळू लागला. हर्षल व इतर लोकांनी चोरट्याचा पाठलाग केला. स्टेशनजवळील श्रेया हॉटेलच्या शेजारील अरुंद बोळात अंधारात लपून बसलेल्या पाकीटचोराला बाहेर येण्यास सांगितले. पण, तो बाहेर न आल्याने हर्षल त्याला पकडण्यासाठी बोळात घुसला. यावेळी चोर आणि हर्षल यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने त्याच्याजवळील धारदार चाकू हर्षलच्या पोटात खुपसून गंभीर दुखापत केली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याची स्थिती नाजूक असल्याने मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पण त्याचा तिथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

“या प्रकरणी जबरी चोरी व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रदीप त्रिपाठी याला अटक करण्यात आली आहे. हा सराईत पाकीटमार असून रेल्वेमध्ये या आरोपीवर पाकीटमारीचे गुन्हे दाखल आहेत.” - सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसVirarविरारMumbaiमुंबई