शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 12:37 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत.

यवतमाळ:  कोरोना वार्ड म्हटलं की कोणी त्या बाजूने फिरकण्याची हिम्मत करत नाही. अनेकदा रुग्णाचेही नातेवाईकान या परिसरात साधी विचारपूस करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. असा कडेकोट बंदोबस्त असताना यवतमाळच्या मेडिकल मध्ये असलेल्या कोरोना रुग्णालयात चक्क चोर शिरला, त्याने एक नव्हे तर तीन मोबाईल लंपास केले. ही घटना रविवारी सकाळी चार वाजता उघड झाली.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत. येथील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये चक्क चोर शिरला. चोरट्याने रुग्णाचे तीन मोबाईल लंपास केले. चोरी तक्रार करताच या रुग्णांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला.

स्वतःचे साहित्य स्वतःच सांभाळावे असे तेथील उपस्थित कर्मचाऱ्याने सुनावले. या उत्तराने रुग्ण संतापले, इतकी सुरक्षा असताना बाहेरची व्यक्ती आत येऊ शकत नाही. या चोरी मागे येथीलच कोणी तरी यात असावा, असा संशय रुगांनी व्यक्त केला. या घटनेची पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.

पीपीई किट घालून चोरी-

कोरोना वार्डमधून रुग्णाचे मोबाईल चोरी करण्यासाठी चोराने पीपीई किट घातलं होतं. त्यामुळे कुणालाच संशय आला नाही. आता कोरोना वॉर्डही चोरापासून सुरक्षित नाही, अशी प्रतिक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णाने 'लोकमत'ला दिली

टॅग्स :RobberyचोरीYavatmalयवतमाळPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस