शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत चोराला पकडून केलेल्या मारहाणीत चोरट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 20:21 IST

Crime News : दरम्यान मारहाणीत मयत झालेला चोरटा हा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असून त्याच्यावर चोरी व घरफोडी सारखे चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

ठळक मुद्देसमसुद्दिन मोहम्मद शेख ( वय २६ रा लाहोटी कंपाउंड ) असे मयत झालेल्या चोरट्याचे नाव आहे.

भिवंडी ( दि . ५ ) शहर परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याला पकडून त्याला केलेल्या मारहाणीमध्ये चोरट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी घडली आहे. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे . अजय वर्मा ( वय २९ ) , अश्रफ खान ( वय  २४ ) , सुरज वर्मा ( वय  २७ ) असे चोरट्याच्या हत्ये प्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत . तर समसुद्दिन मोहम्मद शेख ( वय २६ रा लाहोटी कंपाउंड ) असे मयत झालेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान मारहाणीत मयत झालेला चोरटा हा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असून त्याच्यावर चोरी व घरफोडी सारखे चार गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत.           

शहरातील नारपोली पोलीस ठाणे अंतर्गत बालाजीनगर परिसरामध्ये असलेल्या एका खानावळ मध्ये बुधवारी पहाटे दोघा चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने गेले असता एक चोरटा खानावळीच्या बाहेर दुचाकीवर उभा राहिला व दुसऱ्या चोरट्याने खाणावळीचे शटर उचकटून आत शिरला होता व येथील मोबाईल तसेच बॅग घेऊन जात असताना शटरचा आवाज आल्याने खानावळ मध्ये झोपलेल्या कामगारांनी चोराला बाहेर निघत असताना पाहिले व आरडाओरडा करून कामगारांना तसेच मालकाला उठवून चोराला पकडले  व त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.  दरम्यान आपला साथीदार मित्र पकडला गेला असल्याने बाहेर उभा असलेल्या चोरटा आपल्या दुचाकीवरून पळून गेला. मात्र झालेल्या मारहाणीत समसुद्दिन शेख यास वर्मी मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर झाल्या नंतर मारहाण करणाऱ्या आरोपींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली . गंभीर मारहाण झालेल्या समसुद्दीन यास तात्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या मारहाण व हत्ये प्रकरणी पोलिसांनी खानावळ मालक व त्याच्या दोन कर्मचाऱ्यां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत तिघांनाही अटक केली असून पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहे.

टॅग्स :MurderखूनRobberyचोरीbhiwandiभिवंडीthaneठाणेPoliceपोलिस