शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:14 IST

Sonam And Raja Raghuvanshi Case: सोनम अटकेपूर्वी गाजीपूर येथे ढाब्यावर पोहचली. तिथे तिने ढाबा चालकाला संपूर्ण कहाणी सांगत फोन करण्यासाठी त्याचा फोन मागितला होता.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या राजा रघुवंशीचा मृतदेह शिलांगला सापडल्यापासून पोलीस त्याची पत्नी सोनमचा शोध घेत होती. मध्य प्रदेश आणि मेघालय पोलीस या जोडप्याच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण सोडवत होते. अखेर या प्रकरणातील बेपत्ता सोनमला शोध लागला. सोनमने त्याच्या प्रियकरासोबत मिळून राजाची हत्या केली असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे तर दुसरीकडे सोनमने यूपीच्या गाजीपूर येथे ढाबा चालवणाऱ्याला जी कहाणी सांगितली ती अगदी उलट आहे.

पोलिसांच्या थेअरीनुसार, सोनम रघुवंशीचे राज कुशवाह नावाच्या युवकाची प्रेम प्रकरण होते. त्यात सोनमने राजसोबत मिळून राजाच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याची हत्या केली. परंतु या प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे कारण सोनमच्या अटकेआधी तिने ढाबा चालवणाऱ्याला तिची कहाणी सांगितली होती. सोनम अटकेपूर्वी गाजीपूर येथे ढाब्यावर पोहचली. तिथे तिने ढाबा चालकाला संपूर्ण कहाणी सांगत फोन करण्यासाठी त्याचा फोन मागितला होता.

सोनमनं ढाबाचालकाचा फोन घेऊन तिच्या भावाला फोन केला होता आणि त्यानंतर तिने कथितपणे सरेंडर केले. पोलिसांनी सध्या सोनमला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. गाजीपूर येथे ढाबा चालवणारा साहिल यादव म्हणाला की, सोनम जेव्हा इथं पोहचली तेव्हा ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. रडून रडून ती तिची कहाणी सांगत होती. शिलांगमध्ये तिच्यासोबत चोरीची घटना घडली असं सोनम म्हणाली. त्यानंतर तिच्या डोळ्यादेखतच पतीची हत्या करण्यात आली. 

फॅमिलीकडे मागितली मदत

जेव्हा सोनम पळत पळत ढाब्यावर आली तेव्हा काही लोक ढाब्यावर जेवत होते. त्यात एक महिलाही होती. सोनमला पळताना पाहून ती तिच्याकडे गेली आणि मदतीसाठी विचारणा केली. सोनमने तिच्याकडूनही मोबाईल मागितला होता. जेव्हा महिलेने मोबाईल देण्यास नकार दिला तेव्हा सोनमने माझ्याकडे मोबाईल मागितला. सोनमला मोबाईल दिल्यानंतर तिने कॉल लावला असं साहिल यादवने सांगितले. सोनमने जेव्हा कॉल लावला तेव्हा ती मोबाईलवर धाय मोकलून रडत होती. हॅलो, भैय्या असं ती म्हणाली. साहिलने सोनमच्या भावाला ढाब्याचा पत्ता दिला आणि त्याने लवकरच पोहचतो असं सांगितले. सोनमची अवस्था पाहून साहिलने तिला काय घडले हे विचारले. 

ढाबाचालकाने तिला विचारणा केली तेव्हा सोनम म्हणाली, माझे मे महिन्यात लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसांत मी पतीसोबत मेघालयात फिरायला आली होती. तिथे काही जणांनी माझे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पतीची क्रूर हत्या केली. हत्येवेळी सोनम बेशुद्ध पडली. या गुन्हेगारांनी सोनमला उचलून नेले आणि कित्येक दिवस एकाच खोलीत बंद ठेवले. अपहरणानंतर सोनमला आरोपींनी गाजीपूरला आणले आणि तिथे सोडून दिले. सोनम रात्री १ वाजता ढाब्यावर पोहचली, त्यानंतर ३ वाजता पोलिसांनी सोनमला त्यांच्यासोबत नेले असं ढाबाचालक साहिलने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी