शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 17:59 IST

Parambir Singh :आज पांडे यांच्या वकिलाने सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा देखील हायकोर्टात युक्तिवाद केला आहे. 

ठळक मुद्देराज्य सरकारनं नव्यानं चौकशीचे आदेश दिले आहेत, याचिकाकर्त्यांकडून याचिकेची सुनावणी तूर्तास तहकूब करण्याची मागणी करण्यात आली होती.

राज्य सरकारने सुरू केलेल्या चौकशीविरोधात माजी मुंबईपोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या याचिकेवर सध्या तातडीने सुनावणी घेण्याचे कारण दिसत नाही, असे नमूद करून मुंबई हायकोर्टाने सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली आहे.  'राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने राज्य सरकारने नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही याचिका निरर्थक ठरली आहे', असे म्हणणे सरकारतर्फे मांडण्यात आले.

राज्य सरकारनं नव्यानं चौकशीचे आदेश दिले आहेत, याचिकाकर्त्यांकडून याचिकेची सुनावणी तूर्तास तहकूब करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांच्यावतीनं युक्तिवाद करणारे जेष्ठ वकील मुकूल रोहतगी आणि आभात पोंडा गैरहजर होते. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ९ जूनला घेण्यात येणार असून याप्रकरणीवर तातडीनं सुनावणीची आवश्यकता नाही असं हायकोर्टाने नमूद केलं आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेत नव्याने याचिका केली होती. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिले गेले होते. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावल्याने त्याविरोधात नव्याने एक याचिका दाखल केली. परमबीर सिंग १९  एप्रिलला जेव्हा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटले, तेव्हा त्यांनी त्यांना सरकार त्यांच्यावर अनेक खटले दाखल करणार आहे असे सांगितले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राज्य सरकारला पाठविलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला पांडे यांनी सिंग यांना दिला होता, असे सिंग यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या चौकशीतून माघार घेतली. त्यानंतर आज पांडे यांच्या वकिलाने सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा देखील हायकोर्टात युक्तिवाद केला आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसMumbaiमुंबई