शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडे चोरी, स्वत: न्यायालयात सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:38 IST

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी सुरू होती.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात चोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मागणाऱ्या प्रकरणावर सुनावणी चालू असताना    न्यायमूर्तींनी त्यांच्या शेतात झालेल्या चोरीचा वैयक्तिक अनुभव कोर्टात सांगितला.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी सुरू होती. जामीन मागणाऱ्या वकिलाने युक्तिवाद करताना हा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा आहे म्हणून जामीन दिला पाहिजे, असे सांगितले. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी गुन्हा ‘गंभीर’ नसला तरी, तुमचा अशील चोरीच्या १४ प्रकरणांमध्ये गुंतलेला आहे, असे वकिलांना सुनावले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, माझ्याकडे काही शेतजमीन आणि बोरवेल  आहे. एका पहाटे माझ्या नोकराने  मला फोन केला आणि सांगितले की शेतात चोरी झाली आहे. लाईटच्या खांबापासून बोरवेलपर्यंतच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्या आहेत. मी त्याला स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले.  त्याने पोलीस स्टेशन गाठून ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना घटना सांगितली. घटना ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी म्हणाले, क्या करूं? ये जो चोरी करनेवाला हैं उसे २/३ दिन पहलेही अदालत में पेश  किया था. कोर्टने उसे जमानत पर छोड दिया. अब हम करें तो क्या करे? १४ प्रकरणांमधील सहभागाची दखल घेत न्यायमूर्ती कांत यांनी इतके गुन्हे दाखल होऊनही तो काही सुधरला नाही, असे मत व्यक्त केले. अटकपूर्व जामीन नाकारताना सुप्रीम कोर्टाने, एक समस्या अशीही आहे की, तुम्हाला जामीन मिळाला की तुम्ही तोच व्यवसाय पुन्हा सुरू करता, असे निरीक्षण नोंदविले. 

शेतकरी प्रश्नावर पूर्वीही संवेदनशीलयापूर्वी  न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दिल्लीतील वायू प्रदूषणासंबंधीची सुनावणी करताना,  ते अजूनही शेतकरी आहेत आणि त्यांच्या मूळ गावी सुटीत शेतीची कामे करतात, असे सांगितले होते. पराली (काडीकचरा)  जाळण्याचा  मुद्दा चर्चेत आला, तेव्हा एक शेतकरी म्हणून मी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या स्थितीत आहे.

शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची कुणालाच काळजी नाही, कोणत्या परिस्थितीत त्यांना पराली जाळावी लागते  आणि सरकारने सुचविलेल्या सूचनांचे पालन करण्यास ते का असमर्थ आहेत, याची व्यथा मांडली होती.  

टॅग्स :ThiefचोरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय