शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 21:41 IST

Crime News : परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.

ठळक मुद्देचोरीच्या गुन्ह्यातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह इस्माईल इर्शाद अहमद शेख (२२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी असलेले राहुल चाैहान मात्र नेपाळ येथे पळून गेला आहे.

मीरारोड -  बंद असलेले घर हेरून चोरी करण्यासाठी लॉक उघडायचे म्हणून चावी वाल्यास बोलावले होते. पण चावी न बनल्याने लॉक तोडून ४ लाख रोख व सोन्याचे दागिने चोरले. परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.मीरारोडच्या डॉ. श्रीकांत जिचकर चौक समोरील लतीफ पार्क मध्ये घर असणारे घर मालक हे कामानिमित्त परदेशातील कुवैत येथे असतात. त्यांच्या घराचे लॉक फोडून चोरटयांनी घरातील ४ लाख रोख, सोन्याचे दागिने आणि काही मालमत्तेची कागदपत्रे आदी चोरून नेल्याचे २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी घर मालकाशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. गुन्ह्यातील रक्कम व दागिने जास्त असल्याने या प्रकरणी गुन्हे शाखेने देखील स्वतंत्र तपास चालवला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने तपासादरम्यान एका वृद्ध इसमाकडून माहिती मिळाली की, सदर घराचे लॉक उघडण्यासाठी चावीवाला बोलावण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील चावीवाल्यांकडे चौकशी सुरु केली. त्यावेळी एका चावीवाल्याने आपणास सदर सदनिकेचे लॉकची चावी बनवण्यासाठी नेले होते. पण लॉक पहिले असता ते शक्य नाही म्हणून सांगितले. परंतु मेहनत म्हणून ५० रुपये त्या इसमाने गुगल पेद्वारे चावीवाल्याचे खाते नसल्याने त्याच्या शेजारी बसणाऱ्या चर्मकाराच्या खात्यात जमा केले होते. पोलिसांनी लागलीच चर्मकाराकडे चौकशी केली व त्याच्या बँक खात्यातून माहिती घेऊन ५० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाचा शोध लावला आणि चोरीच्या गुन्ह्यातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह इस्माईल इर्शाद अहमद शेख (२२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी असलेले राहुल चाैहान मात्र नेपाळ येथे पळून गेला आहे.राहुल व १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मिळून सदर घरफोडी केली. घराच्या देखभालीची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीच्या परिचयातील तो अल्पवयीन आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर चोरीचे दागीने हे राहुल ने इस्माईल कडे ठेवण्यास दिले होते . गुन्हे शाखेने आरोपीस अटक करून २२८ ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले व मीरारोड पोलिसांच्या हवाली केले आहे.  तर मीरारोड पोलिसांनी आरोपीच्या शीतल नगर येथी घरातून ३०२ ग्राम असे मिळून एकूण ५३० ग्राम दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर दागिन्यांची किंमत सुमारे १५ लाखांच्या घरात आहे. पोलीस हे मुख्य आरोपी राहुलचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Robberyचोरीgoogle payगुगल पेPoliceपोलिसmira roadमीरा रोडArrestअटक