शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राशी लग्न करायला ‘त्याने’ लिंग बदललं अन् आता संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:40 IST

३ वर्षापूर्वी रवी त्याचे आयुष्य सुखाने जगत होता. एका कंपनीत तो मित्र अर्जुनसोबत काम करत होता.

चंडीगड – पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. ज्याठिकाणी लग्नाच आमिष दाखवून एका युवकानं त्याचाच मित्र रवीला मुलगी बनवलं आणि त्यानंतर लग्न करून त्याला कुटुंबापासून दुरावलं. मात्र काही दिवसांनी अर्जुननं त्याला सोडून किन्नरांच्या हाती सोपवलं आहे. सध्या हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलीस रवी जो आता रिया बनली आहे. तिला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

३ वर्षापूर्वी रवी त्याचे आयुष्य सुखाने जगत होता. एका कंपनीत तो मित्र अर्जुनसोबत काम करत होता. हळूहळू अर्जुन आणि रवी दोघंही एकमेकांच्या इतके जवळ आले की, त्यांच्यात काहीच अंतर राहिलं नाही. अर्जुनने रवीला लग्नाची मागणी घातली. परंतु त्यासाठी अर्जुननं रवीसमोर एक अट घातली. ही अट म्हणजे रवीला मुलगा न राहता मुलगी बनावं लागेल त्यानंतर ते दोघं एकमेकांशी लग्न करतील. प्रेमात आंधळा झालेल्या रवीने अर्जुनची ही अट मान्य केली. आणि रवीचा रिया बनण्यास तयार झाला.

रियाला तृतीयपंथीयांकडे सोपवण्याचा अर्जुनचा डाव

रवी उर्फ रियाचं म्हणणं आहे की, काही वर्षापूर्वी माझं नाव रवी होते. परंतु लिंग बदल करून त्याने रिया नाव ठेवले. अर्जुन आणि मी एकत्र काम करत होतो. लग्नासाठी अर्जुनने सुरुवातीला लिंग बदल करण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी रिया बनले आणि त्याच्याशी लग्न केले. कुटुंबानेही मला स्वीकारलं. परंतु काही दिवसांनी अर्जुनने मला सोडून दिले. आता तो मला तृतीयपंथीयांकडे सोपवत आहे. परंतु मला त्याच्यासोबत राहायचं आहे. कारण त्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहचले आहे. अर्जुननं आपल्यासोबत फसवणूक केली असा आरोप रवी उर्फ रियानं पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जसबीर सिंह म्हणाले की, आमच्याकडे या प्रकाराची तक्रार आली आहे. रवीने अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी त्याचे जेंडर चेंज केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.