शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीला बेशुद्ध केलं, जिवंत कालव्यात सोडलं, मग दोन वर्षे सासरच्यांना चकवलं, अखेर असं बिंग फुटलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 19:41 IST

Crime News: मध्य प्रदेशमधील मुरैना येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी एखाद्या क्राईम स्टोरीला लाजवेल असा कट रचला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात जवळपास दोन वर्षे धूळफेक केली.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील मुरैना येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी एखाद्या क्राईम स्टोरीला लाजवेल असा कट रचला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात जवळपास दोन वर्षे धूळफेक केली. मात्र एका चुकीने तिच्या सगळ्या कारस्थानाची पोलखोल झाली. या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यासाठी त्यांनी असा मार्ग अवलंबला की ज्यामुळे कुणालाही फारसा संशल आला नाही. या महिलेने प्रथम पतीला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्यांना जिवंत वाहत्या पाण्यात सोडले. पोलिसांनी हा मृतदेह जप्त केला. मात्र बेवारस समजून तो दफन केला. 

त्यानंतर पत्नीने चालाखी करत आपला पती म्हणून जवळपास २२ महिने प्रियकराला सासूशी बोलायला लावले. तसेच आपले पती कुठेतरी दूर काम करण्यासाठी गेले आहेत, असे तिने सासूला सांगितले. मात्र पत्नीच्या एका चुकीमुळे तिचं बिंग फुटलं. झालं असं की, तिने तिच्या नणंदेसोबत प्रियकराला बोलायला लावले. मात्र तो आवाज आपल्या भावाचा नाही, हे तिने अचूक ओळखले. त्यानंतर ती तिच्या आईला घेऊन थेट पोलिसांकडे गेली. तसेच भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता पत्नी आणि तिच्या प्रियकराने केलेले कुकृत्य उघडकीस आले. 

हे संपूर्ण प्रकरण सिंहौनियाजवळच्या एका गावात घडले आहे. गावातील विश्वनाथ नावाचा तरुण वृद्ध आई आणि पत्नीसोबत राहत होता. त्याची बहीण शेजारच्या गावात राहते. यादरम्यान, विश्वनाथच्या पत्नीचं प्रेमप्रकरण हे त्यांच्या शेतात राहणाऱ्या एका तरुणासोबत सुरू झालं. विश्वनाथच्या आईला दिसत नसे, तसेच ऐकू येत नसे. याचा फायदा घेऊन सदर महिला प्रियकराला नेहमी भेटायला बोलवायची. मात्र विश्वनाथ असेपर्यंत आपलाल्या एक होता येणार नाही याची खात्री पटल्याने त्यांनी त्याला मार्गातून हटवण्याची योजना आखली. 

२३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्नी पतीला सामान खरेदी करण्याच्या बहाण्याने घेऊन गेली. त्यानंतर त्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे कपडे काढले आणि त्याला जिवंतच कालव्यात सोडले. दुसऱ्या दिवशी सासू विचारू लागली तेव्हा तो कामासाठी गुजरातला गेल्याचे सांगितले. तसेच तिने सासर सोडून ती प्रियकरासोबत मुरैना येथे राहू लागली. जेव्हा पतीची आई मुलाबाबत विचारायची तेव्हा ती प्रियकरासोबत तिचं बोलणं घडवून आणायची. मात्र नणंदेसोबत त्याला बोलायला लावण्याची चूक तिने केली आणि तिचं सगळं बिंग फुटलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश