शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

बँकेच्या एटीएमचे ३ कोटी रुपये पळवणारा एका दिवसात गजाआड, नालासोपाऱ्यातून व्हॅन चालकाच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:30 IST

सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबात जवळपास १० ते १५ जणांचा समावेश असून, एटीएम रक्कम चोरीतही त्यांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे.

मुंबई: युनियन बँकेच्या गोरेगाव परिसरातील एटीएममध्ये भरण्यासाठी व्हॅनमधून आणलेली जवळपास ३ कोटी रुपयांची रोकड घेऊन व्हॅनचा चालक उदयभान सिंग (३४) हा सोमवारी पसार झाला. याप्रकरणी कसून तपास करत सोमवारी रात्रीच नालासोपारा परिसरातून उदयभानच्या मुसक्या आवळण्यात परिमंडळ ११ च्या पथकाला यश मिळाले. अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याचे अख्खे कुटुंब यामध्ये सामील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबात जवळपास १० ते १५ जणांचा समावेश असून, एटीएम रक्कम चोरीतही त्यांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा आणि परिमंडळ ११ चे पोलीस उपयुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथकांची नियुक्ती करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिंग हा गोरेगाव रेल्वेस्थानकावरून अंधेरी, दादर, असे करत पुन्हा वेगवेगळे स्थानक बदलत नालासोपाऱ्याला पोहोचला. यादरम्यान त्याने तीन रिक्षादेखील बदलल्या. मात्र, पोलीस पथक त्याच्या मागावर होते आणि अखेर उशिरा रात्री त्याला अटक करण्यात आली. त्याने पत्नीसोबत मिळून २०१४ मध्ये कस्तुरबा पोलिसांच्या हद्दीत साडेसहा कोटींचे हिरे चोरले होते. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असून, चोरीला गेलेली रक्कमदेखील परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

बँकेने पार्श्वभूमी पडताळली का?सिंग हा अभिलेखावरील गुन्हेगार असूनही  युनियन बँकेने त्याला एटीएमसारख्या संवेदनशील विभागात नोकरी कशी दिली? त्यांनी त्याची पार्श्वभूमी पडताळली का? त्याला याठिकाणी कोणी रुजू केले? असे अनेक प्रश्न आता या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

‘कानून के लंबे हाथ’ पोहोचलेच! - सिंग हा कुटुंबीयांसह गुन्ह्यांचादेखील म्होरक्या आहे. हवाला, बँक एटीएमसारख्या करोडोंचे व्यवहार होणाऱ्या ठिकाणी नोकरी करत त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर संधी साधत त्याठिकाणी डल्ला मारत पसार व्हायचे, अशी त्याची कार्यपद्धती आहे. यासाठी पत्नी, मुले आणि भावंडे या सर्वांना प्रशिक्षण दिले आहे. - त्यांचे मोबाइल काढून घेत भाडेतत्त्वावरील घरही दोन आठवड्यांपूर्वीच रिकामे करून पत्नी व मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवले. पकडले गेल्यावरही ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांना काय सांगायचे याचीही तयारी त्याने कुटुंबीयांकडून करून घेतली हाेती. - नालासोपारा परिसरातच चार दिवस थांबून नंतर पसार होणार होता. पण ‘कानून के लंबे  हात’ त्याच्यापर्यंत पोहोचलेच. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसMumbaiमुंबई