शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचा सस्पेन्स वाढला! 'त्या' रात्री आश्रमात नक्की काय घडलं? SITने केला सीन रिक्रिएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 20:51 IST

मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप ठोस कारण समोर न आल्याने, विशेष तपास पथकाने रविवारी बोरानाडा येथील त्यांच्या आश्रमावर छापा टाकला.

राजस्थानातील प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप ठोस कारण समोर न आल्याने, विशेष तपास पथकाने रविवारी बोरानाडा येथील त्यांच्या आश्रमावर छापा टाकला. पोलीस आयुक्त ओमप्रकाश पासवान आणि एसीपी छवी शर्मा यांच्या उपस्थितीत आश्रमातील पुरावे गोळा करण्यात आले असून, तपासासाठी आश्रमाचा काही भाग सील करण्यात आला आहे.

तीन तास कसून चौकशी आणि सीन रिक्रिएशन 

रविवारी एसआयटीने साध्वींचे वडील विरमनाथ आणि त्यांच्या ड्रायव्हरची तब्बल तीन तास उलटतपासणी केली. ज्या रात्री ही घटना घडली, तेव्हा नेमके काय झाले होते, हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावर सीन रिक्रिएट केला. ड्रायव्हर सुरेशने दिलेल्या जबानीत साध्वींना उलट्या झाल्याचे सांगितले होते, तर वडिलांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे म्हटले होते. या परस्परविरोधी विधानांमुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.

मृत्यूच्या तीन थिअरीज: अन्न, विष की इंजेक्शन? 

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट न झाल्याने पोलीस तीन वेगवेगळ्या दिशांनी तपास करत आहेत.

पहिली थिअरी: जेवताना अन्न घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला का?

दुसरी थिअरी: त्यांना धीम्या गतीने विष देण्यात आले होते का?

तिसरी थिअरी: एखाद्या घातक इंजेक्शनच्या संसर्गामुळे त्यांचा जीव गेला का?

वडील संशयाच्या भोवऱ्यात? 

साध्वींचे वडील विरमनाथ यांची चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा एसीपी कार्यालयात बोलावण्यात आले. त्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली पोलीस त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. नर्सिंग कर्मचारी देवीसिंह याच्या भूमिकेबाबतही पोलीस सध्या माहिती गोळा करत आहेत. आश्रमातील लोकांकडून मिळालेल्या काही नवीन माहितीची पडताळणी सध्या एफएसएल टीमकडून केली जात आहे.

"आम्ही प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी करत आहोत. वडिलांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीची शहानिशा सुरू आहे. सध्या तपासाबाबत कोणतीही अंतिम प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल," असे एसीपी छवी शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sadhavi's death mystery deepens: SIT recreates scene, suspicion on father.

Web Summary : Sadhavi Prem Baisa's death remains a mystery. SIT recreated the ashram scene and questioned her father and driver due to conflicting statements. Theories explored include food obstruction, poisoning, or lethal injection. Police are investigating all angles.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान